उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांना घेरले, अदानीचे विमान जामगरला जायला चालते. पण प्रकल्प अदानींनी करू नये
_उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता शिंदे सरकारमधील उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांना घेरले आहे. जामनगरमधील लग्नासाठी काही लोकं दोन वाजता लँड झाली.ते विमान अदानीचे होते, अंबानीचे नव्हते. अदानीचे विमान फिरायला चालतं, अदानीचे विमान जामगरला जायला चालते. पण प्रकल्प अदानींनी करू नये अशा प्रकारची वाईट राजकीय प्रवृत्ती वाढत आहे. या प्रवृत्तीमुळे आपणा सर्वांचा तोटा होत असल्याची टीका सामंत यांनी केली. www.konkantoday.com