आता महाप्रसाद कार्यक्रमासाठी ऑनलाईन परवानगी घेणे बंधनकारक
महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून महाप्रसादातून विषबाधा होत असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. यामुळे अन्न व औषध प्रशासनाने याबाबत गंभीर दखल घेतली आहे. आता महाप्रसादाचे आयोजन करायचे असल्यास त्याबाबतची नियमावली अन्न व औषध प्रशासनाने जारी केली आहे.महाप्रसादाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी शंभर रुपये शुल्कासह ऑनलाईन परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागणार आहे. तपासणीसाठी प्रशासनाची पथके देखील तयार करण्यात आली आहेत. नियमांचे पालन न केल्यास अन्न, सुरक्षा व मानके कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.अशा आहेत सूचनावेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करा.शुद्ध पाण्याचा वापर.कच्चे अन्नपदार्थ नोंदणीकृत परवानाधारकांकडूनच खरेदी करा.महाप्रसाद बनवताना योग्य ती खबरदारी घ्या.कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घ्या.www.konkantoday.com