
संघटनांच्या मागणीमुळे प्राथमिक शिक्षक नियुक्त्यांसाठीची प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता
नव्या प्राथमिक शिक्षक भरतीतील समुपदेशनाने नियुक्ती मिळणार्या उमेदवारांना येत्या आठवडाभरात नियुक्तीपत्रे दिली जातील अशी आशा होती. परंतु राज्यातील शिक्षक संघटनांनी नव्या उमेदवारांना रिक्त शाळा देण्यापूर्वी कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षकांची जिल्ह्यांतर्गत प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणी शासनाकडे केली आहे. त्यामुळे ही बदली प्रक्रिया राबवल्यास नव्या उमेदवारांची नियुक्ती लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकून पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.नव्याने होणार्या प्राथमिक शिक्षक भरतीसाठी उमेदवारांची कागदपत्र पडताळणी झाली आहे. समुपदेशनाद्वारे त्यांना जिल्ह्यात नियुक्त्या रिक्त शाळा दिल्या जाणार आहेत. राज्यातील सर्वच प्राथमिक शिक्षक संघटनांनी जिल्ह्यांतर्गत बदल्यांची प्रक्रिया झाल्यानंतर समुपदेशन घ्यावे अशी मागणी केली आहे.www.konkantoday.com