प्रशासकीय राजवटीत देखील अनधिकृत गाळ्यांचा सुकाळ,**जागेच्या वादावरून सुरीने हल्ला करण्याचा प्रकार
रत्नागिरी शहरात सध्या जोमाने फुटपाथ बांधण्याचे काम चालू असून त्या पाठोपाठ त्यावर अनधिकृत खोके उभारण्याचे कामही नगर परिषदेच्या कृपेने जोरात सुरू आहे आम्ही हप्ते देतो म्हणून आम्हाला जागा मिळते असे राजरोसपणे सांगितले जाते त्यामुळे हे हप्ते नेमके कोण वसूल करतोय याचाही शोध घेणे जरुरीचे आहे त्यामुळे सध्या रत्नागिरी शहराला स्वच्छ शहर किताब मिळण्याचे बकाल शहर किताब मिळण्याची शक्यता दिसत आहे अशाच अनधिकृत जागेच्या वादावरून कालरत्नागिरी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर फळ विक्रेत्याच्या भावाने तेथील जागेच्या वादातून खोके धारकावर सुरीने वार केले. ही घटना बुधवार 6 मार्च रोजी सायंकाळी 4 वा.सुमारास घडली.याबाबत राजाराम गोपीनाथ सावंत (65, रा. झारणरोड, रत्नागिरी) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, त्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील मारुती मंदिरच्या बाजुला पानटपरीचा खोका आहे. त्याठिकाणचे रस्त्याचे काम काही दिवसांपूर्वी सुरु झाल्याने त्यांनी आपल्या टपरीचा खोका बाजुला केला होता. या दरम्यान, मंगळवार 5 मार्च रोजी सुनिल कोळी या कलिंगड विके्रत्याने त्याठिकाणी आपला व्यवसाय सुरु होता. बुधवार 6 मार्च रोजी त्याठिकाणचे रस्त्याचे काम पूर्ण झाल्यामुळे राजाराम सावंत आपला खोका नेहमीच्या ठिकाणी ठेवण्यासाठी गेले असता सुनिल कोळीने आपला कलिंगडचा व्यवसाय बाजुला करण्यास नकार दिला. यातून त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. म्हण्ाून सुनिल कोळीने आपला भाउ,बायको आणि आईला बोलावून घेतले. तर राजाराम सावंत यांनी आपली मुलगी आणि बायकोला बोलावून घेतले.हे सर्वजण तिथे आल्यावर त्यांच्यात पुन्हा वाद होउन सुनिल कोळीने राजाराम सावंत यांना शिवीगाळ करत ढकलून दिले तर त्याच्या भावाने बाजुच्या कलिंगड कापण्याच्या सुरीने राजाराम सावंत यांच्या डोक्यात मारुन गंभिर दुखापत केली. याप्रकरणी संशयित सुनिल कोळी, त्याची बायको,भाउ आणि आई विरोधात त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.www.konkantoday.com