ओरडत का जाता अशी विचारणा करणार्‍याला टोळक्या कडुन मारहाण

रस्त्याने जाताना ओरडत का जाता याची विचारणा केल्याचा राग एका टोळक्याला येऊन त्यांनी हा प्रश्न विचारणाऱ्याला मारहाण केली, हा प्रकार दापाेली गिम्हवणे येथे घडला.
गिम्हवणे सहकार नगर येथील सचिन सावंत व संजय झगडे हे त्यांचे मित्र उदय झगडे यांना घरी सोडून परत येत असताना गिम्हवणे येथील भैरी मंदिर ते तेलीवाडी रस्त्याने समोरून पाच जण आरडा ओरड करत येत होते, त्यांना संजय झगडे यांनी कारे ओरडता असे विचारले असता त्याचा राग येऊन सचिन झगडे याने अंगावर धावत जाऊन त्यांच्या डोक्यात बांबू मारला तर सुशांत झगडे, स्वप्नील झगडे, केतन झगडे, ओंकार झगडे यांनी सचिन सावंत यांना जमिनीवर पाडून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार सचिन सावंत यांनी दापोली पोलीस ठाण्यात दिली असून या तक्रारीनुसार पाच संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button