स्वामी स्वरूपानंतर पतसंस्थेच्या अर्थकारणाचे यश हे नारीशक्ती च्या सहभागामुळेच अधिक प्रभावी ठरते – अॅड. दीपक पटवर्धन
स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या यशस्वी अर्थकारणात महिला वर्गाचे योगदान लक्षणीय आहे. स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने महिला वर्गाचे महत्त्व लक्षात घेऊन महिला वर्गाला संस्थेबरोबर संलग्न ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले, योजना राबवल्या. त्या सर्व योजनांना महिला वर्गाचा सातत्याने प्रतिसाद प्राप्त होत राहिला. नारीशक्तीचा आर्थिक सहभाग हा अनमोल असा आहे. सर्वच क्षेत्रात नारीशक्ती अग्रेसर आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी शासनाने नारीशक्तीचे महत्त्व ओळखून नारीशक्तीचा सन्मान करत त्यांना अधिक संधी उपलब्ध करून देण्याचे धोरण अवलंबले. या धोरणाशी सुसंगत असे धोरण स्वामी स्वरूपांत पतसंस्थेने आरंभा पासूनच अनुसरले आहे. स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेची विश्वासार्हता, पारदर्शक व्यवहार, उत्तम ग्राहकसेवा यामुळे मोठ्या प्रमाणावर महिला वर्गाचे व्यवहार सातत्याने विश्वासाने स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेमध्ये होत असतात. *लक्षणीय नारी सहभाग*स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेत नारीशक्तीच्या 151 कोटी 41 लाखांच्या ठेवी जमा आहेत. संस्थेतील महिला सभासदांची संख्या 21 हजार 481 आहे, महिला कर्जदार त्यातही लघुउद्योजक महिला कर्जदारांचे प्रमाण ही लक्षणीय आहे. 11 हजारच्या घरात महिला कर्जदार स्वरूपानंद पतसंस्थेत आहेत. 304 कोटींच्या ठेवीत 151 कोटी महिला वर्गाच्या ठेवी तर 45 हजार सभासद संख्येत 21 हजार महिला सभासद ही आकडेवारी लक्षणीय आहे. महिला वर्गाच्या या योगदानातून प्रामुख्याने सहकार चळवळीतील सक्रिय योगदानातून स्वरुपानंद पतसंस्थेला सातत्याने सकारात्मक उर्जा आणि प्रेरणा प्राप्त होते. ‘महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर स्वामी स्वरूपानंद पतसंस्था समस्त नारीशक्तीचे अभिनंदन करते व नारीशक्तीला अभिवादन ही करत आहे’ अशी भावनिक प्रतिक्रिया अॅड. दीपक पटवर्धन, अध्यक्ष, स्वामी स्वरूपानंद पतसंस्था यांनी दिली.www.konkantoday.com