
रत्नागिरी नगरपरिषदेच्या अंदाजपत्रकात रत्नागिरीकरांवर यंदा कोणतीही करवाढ नाही
रत्नागिरी नगर परिषदेच्या इतिहासात सत्ताधार्यांविना दुसर्यांदा प्रशासकाच्या माध्यमातून पुढील २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. रत्नागिरी शहरवासियांवर कोणतीही करवाढ नसणार्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे.सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी २२५ कोटी ५४ लाख २३ हजार ७७० रुपये जमेची आणि २२१ कोटी ९२ लाख २२ हजार १९६ खर्चाचे, अशा एकूण ३ कोटी ६३ लाख १,५७४ रुपये शिलकीच्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली आहे. नगर परिषदेच्या माध्यमातून महसुली खर्च, भांडवली खर्च तसेच व्यवहार व कार्यक्रम अंमलबजावणीच्या खर्चाच्या तरतुदीत गतवर्षीच्या तुलनेत वाढ करण्यात आली आहे. मागील फेब्रुवारी महिन्यात अखेरच्या आठवड्यात या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली.www.konkantoday.com