
सुनेत्रावहिनी पवार बारामतीच्या उमेदवार; NCP च्या प्रदेशाध्यक्षांनीच केली घोषणा
आगामी लोकसभा निवडणुकांच्या घोषणेला अवघे काही दिवसच उरले असून उमेदवारांच्या नावांची चाचपणी सुरू आहे. त्यातच, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीमुळे यंदाच्या निवडणुकीत चांगलीच रंगत येणार आहे.तर, कायम चर्चेत असलेल्या बारामती मतदारसंघात यंदा पवार विरुद्ध पवार असाच सामना पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यंदा राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे. त्यासंदर्भात आता प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी घोषणाच केली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाची यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे. कारण या मतदारसंघाच्या इतिहासात प्रथमच पवार कुटुंबातील दोन व्यक्ती आमने-सामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहेwww.konkantoday.com