
सेवानिवृत्ती नंतर शिक्षिकेने पंतप्रधान मदत निधीला दिली पन्नास हजाराची देणगी
सेवानिवृत्तीनंतर एका शिक्षिकेने करोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मदत निधीला पन्नास हजाराची देणगी देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे.
निवेंडी (ता. रत्नागिरी) येथील जिल्हा परिषदेच्या केंद्रप्रमुख सौ. वैजयंती पाटील काल आपला प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्या. त्यानंतर आज सेवानिवृत्तीच्या पहिल्या दिवशी त्यांनी करोना आजाराशी लढण्याकरिता प्रधानमंत्री मदत निधीमध्ये पन्नास हजार रुपये जमा केले. देश संकटात असताना आपलीही मदत झाली पाहिजे, या उद्देशाने मी माझा खारीचा वाटा उचलला आहे असे त्यानी सांगितले.
www.konkantoday.com