रत्नगिरीत ११ मार्चला ‘निर्भय बनो’ सभेचे आयोजन
*रत्नागिरी :* आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशात चाललेल्या हुकूमशीविरोधात प्रबोधन करण्याच्या उद्देशाने रत्नागिरीत ११ मार्चला निर्भय बनो सभेचे आयोजन केले आहे. यात सामाजिक कार्यकर्ते तसेच विचारवंत व पर्यावरणतज्ज्ञ डॉ. विश्वंभर चौधरी आणि मानवी हक्क, संविधान विश्लेषक व कायदेतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे मानवी हे मार्गदर्शन करणार आहेत. ही सभा छत्रपती शिवाजी नगर येथील शासकीय जलतरण तलाव मैदानावर सायंकाळी ४ वाजता होणार आहे. ही सभा ‘आम्ही निर्भय रत्नागिरीकर’च्या वतीने होणार आहे. बेरोजगारी, भ्रष्टाचार, महिलांवरील अन्याय, अल्पसंख्यांक समुदायांच्या अधिकारांचा संकोच, शेतकऱ्यांच्या वाढणाऱ्या आत्महत्या, दलितांवरील अत्याचार, सांविधानिक संस्था व प्रशासकीय यंत्रणा यांवर निर्माण केलेल्या दबाव, डिजिटल माध्यमांवर निर्माण केलेली हुकूमत आदी आजचे कळीचे मुद्दे आहेत; मात्र या मूलभूत प्रश्नांकडे जनतेचे लक्ष जाऊ नये म्हणून मंदिर, मस्जिद मुद्दे उपस्थित करून सर्वसामान्य जनतेचे लक्ष वळवले जात आहे. संसदेत मूलभूत प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या खासदारांना मोठ्या प्रमाणावर सांविधानिक पद्धतीने निलंबित केले जात आहे. सरकारी उद्योगांचे खासगीकरण, कमी पटसंख्येच्या नावाखाली हजारो शाळा बंद करत बहुजनांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित केले जात आहे. भांडवलदारांच्या हिताचा विचार करून शेतकरी आणि आदिवासींच्या जमिनी बेकायदेशीर हस्तांतरित केल्या जात आहेत. शेतीचे कंपनीकरण करण्याचे धोरण, कामगारांच्या सुरक्षिततेसाठी बनविलेले कायदे बदलून भांडवलदारांच्या हिताचे करण्याचे काम सुरू आहे. माध्यमांचे स्वातंत्र्य काढून घेतले जात आहे. सरकारी यंत्रणांचा वापर करून देशातील विरोधी पक्ष संपविण्याची प्रक्रिया बिनदिक्कत सुरू आहे. सरकारच्या जनविरोधी धोरणांविरुद्ध बोलणाऱ्या, लिहिणाऱ्या, प्रश्न विचारणाऱ्या लोकांना देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात टाकले जात आहे. अशा परिस्थितीत समाजातील बुद्धिजीवी, विचारवंत, समाजिक जाणीव असणारी व्यक्ती, संस्था, संघटना, पक्षांनी शांत न राहता निर्भय होऊन या व्यवस्थेच्या विरोधात संघटितपणे लढा उभारणे गरजेचे आहे. यादृष्टीने प्रबोधन करण्याच्या उद्देशाने ‘निर्भय बनो’ हे अभियान महाराष्ट्रभर राबविले जात आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून ‘आम्ही निर्भय रत्नागिरीकर’तर्फे येथे ही सभा आयोजित केली आहे. या सभेला रत्नागिरी शहर-तालुका तसेच संगमेश्वर, लांजा, राजापूर तालुक्यातून जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजक अभिजीत हेगशेट्ये, दीपक राऊत, बशीर मुर्तुझा, विलास कोळपे, कुमार शेट्ये यांनी केले आहे. ही सभा यशस्वी होण्यासाठी विजय जैन, नदीम सोलकर, रफीक बिजापूरी, रघुवीर शेलार, अशोक भाटकर, एस. व्ही. शेलार, रवींद्र कोळवणकर, रामभाऊ गराटे, नीलेश भोसले, काका तोडणकर, अॅड. अश्विनी आगाशे, श्रुती सुर्वे, कल्पना भिसे, वल्लभ वणजू, रहीम दलाल, निस्सार दर्वे, सादीक पावसकर, विजय कुरडकर, दिलावर गोदड, विनोद वायंगणकर, बबन आंबेकर, विकास पेजे, नजीर वाडकर, सईद पावसकर, आप्पा वांदरकर, दीपक सुर्वे, शब्बिऱ भाटकर, रवी घोसाळकर, नौसीन काझी, प्रीतम आयरे, खालील वस्ता हे मेहनत घेत आहेत. *सभेची माहिती* *दिवस :* सोमवार, ११ मार्च २०२४ *स्थळ :* शासकीय जलतरण तलाव मैदान, छत्रपती शिवाजी नगर, *वेळ :* सायंकाळी ४ वाजता*आजच्या प्रेसला उपस्थिती*अभिजीत हेगशेट्ये, दीपक राऊत, विलास कोळपे, नीलेश भोसले