वडाप करणार्या रिक्षा चालकांविरोधात राजापुरातील रिक्षा व्यावसायिकच आक्रमक
राजापूर शहरातील धुतपापेश्वर रिक्षा स्टँडच्या चालक-मालकांच्यावतीने वडापच्या विरोधात बैठक घेण्यात आली. या बैठकीत वडापला आळा बसावा यासाठी एकजूट करण्यात आली.शहरातील जवाहर चौकाजवळील दादर या परिसरात धुतपापेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज पथ, बंदर धक्का, एसटी डेपो अशा चार रिक्षा स्टँडना मान्यता असताना काही मुजोर रिक्षा चालक-मालक राजरोस जवाहर चौक ते एसटी डेपो वडाप करत असल्याचे स्टँडच्या लाईनमध्ये असणार्या रिक्षा चालकांना तासनतास भाडे मिळण्यासाठी प्रतिक्षा करावी लागते व भाडे मिळत नसल्याने प्रवाशांची वाट बघत ताटकळत रहावे लागते. त्यामुुळे प्रामाणिकपणे व्यवसाय करू इच्छिणार्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.www.konkantoday.com