
लोकशाही दिनात ४ अर्ज प्रलंबित अर्ज तात्काळ मार्गी लावा-जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह रत्नागिरी, दि. ४ (जिमाका)- आजच्या लोकशाही दिनात कृषी -१, राजापूर नगरपरिषद १, रत्नागिरी नगरपरिषद १ आणि जिल्हा परिषदेकडील १ असे एकूण ४ अर्ज दाखल झाले होते. प्रलंबित अर्ज तात्काळ मार्गी रावण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले.
*लोकशाही दिनात ४ अर्ज**प्रलंबित अर्ज तात्काळ मार्गी लावा-जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह**रत्नागिरी, दि. ४ (जिमाका)- आजच्या लोकशाही दिनात कृषी -१, राजापूर नगरपरिषद १, रत्नागिरी नगरपरिषद १ आणि जिल्हा परिषदेकडील १ असे एकूण ४ अर्ज दाखल झाले होते. प्रलंबित अर्ज तात्काळ मार्गी रावण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले.* जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज लोकशाही दिन झाला. यावेळी अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, उपजिल्हाधिकारी (सर्वसाधारण) शुभांगी साठे, भू संपादन अधिकारी मारुती बोरकर, जिल्हा भूमी अधिक्षक एन एन पटेल आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी प्रलंबित ९ अर्जांचा आढावाही यावेळी घेतला. सर्वसामान्य नागरिकांचे अर्ज वेळीच निकाली काढावेत. ते प्रलंबित राहणार नाहीत याची काळजी घ्यावी, असे निर्देश यावेळी दिले.