
दाभोळ खाडीत थांबलेल्या चिनी खलाशांची आपापसात मारामारी
दापोली :दापोली तालुक्यातील दाभोळ खाडीत ८ चिनी नौका थांबल्या आहेत. या चिनी बोटीवर चिनी, फिलीपाईन्स व इंडोनेशियाचे खलाशी आहेत. सध्या हे खलाशी शिपयार्डच्या आवारात रहात आहेत. मात्र या खलाशांमध्ये पगाराच्या कारणावरून आपापसात मारामारी व हाणामारी झाली. याबाबत अधिकारी वर्गाने मध्यस्थी केल्याने हे प्रकरण मिटले. त्यामुळे या मारामारीबाबत पोलिसांत कोणतीच तक्रार झालेली नाही. या बोटीवरील कर्मचारी वर्ग दाभोळ उसगांव परिसरात फिरत असतो. त्यामुळे ग्रामस्थांच्यात संशयाचे वातावरण आहे.
www.konkantoday.com