मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात केंद्रीय निवडणूक आोयागाकडून निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली जाण्याची शक्यता
_देशात पुढील काही दिवसांत लोकसभा निवडणुकीचा थरार रंगणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने आपली सत्ता राखण्यासाठी संपूर्ण ताकद झोकून दिली असून दुसरीकडे विरोधकांची इंडिया आघाडीही यश मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे.मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात केंद्रीय निवडणूक आोयागाकडून निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली जाईल, अशी शक्यता गेल्या काही दिवसांपासून वर्तवली जात होती. अशातच याबाबत आता नवी तारीख समोर आली असून १४ मार्च रोजी निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन निवडणूक तारखांची घोषणा करू शकतो, अशी माहिती समोर आली आहे. मागील निवडणुकीप्रमाणे यंदाही सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पाडली जाईल, असे समजते.www.konkantoday.com