
जीजीपीएसच्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडा बाजार
रत्नागिरी येथील र.ए. सोसायटीच्या जीजीपीएस प्रांगणात प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी आठवडा बाजार उपक्रम राबवला. विद्यार्थ्यांनी शालोपयोगी साहित्य, भाज्या, खाऊ आदींचे स्टॉल्स मांडून एकप्रकारे दुकानदार झाल्याची प्रचिती आणून दिली.या उपक्रमांचे उदघाटन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी सतीश शेवडे आणि शाळा समिती अध्यक्ष मंदार गाडगीळ यांनी केले. यावेळी मुलांचे कौतुक करण्यासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सोनाली पाटणकर व प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका अपूर्वा मुरकर उपस्थित होत्या. यावेळी छोट्या विक्रेत्यांनी शाळा उपयोगी साहित्य, विविध भाज्या तसेच खाऊगल्लीमधून भेळ, मंच्युरिअनसारखे खाद्यपदार्थ, सरबत, आईस्क्रिम, विविध फळे आदी खूप काही वस्तूंची विक्री करत आनंद घेतला. यावेळी शिक्षक आणि पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन खरेदी करत उपक्रमातील छोट्या विक्रेत्यांचा उत्साह वाढवला. या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे.www.konkantoday.com