
रोहित पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, ’22 आमदार अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांकडे येणार’
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन्ही दिग्गज नेते सध्या एकमेकांच्या विरोधात आहेत. अजित पवार यांच्याकडे जास्त आमदारांचं बहुमत आहेत. तर शरद पवार यांच्याकडे फार कमी आमदारांचा पाठिंबा आहे. असं असताना शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणि पवार कुटुंबात कोणतीही फूट पडलेली नाही, असं वक्तव्य केलं आहे. त्यानंतर शरद पवार गटाचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. आगामी लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर अजित पवार गटात गेलेले राष्ट्रवादीचे 22 आमदार परत शरद पवारांकडे येतील, असा मोठा दावा रोहित पवार यांनी केला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. “बारामती लोकसभा मतदारसंघात काय होईल हे जनताच ठरवेल. अमित शाह, नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात यावं लागतं. कारण त्यांना लोकांची भीती आहे. बारामतीची जनता ही पवारांच्या आणि विचारांच्या पाठिशी राहील. वेगवेगळे सर्वे असतात. मात्र महाविकास आघाडीला 30 जागा मिळतील. 18 ते 20 जागा महायूतील मिळतील”, असा दावा रोहित पवारांनी केला आहे.www.konkantoday.com