मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ येथे महामार्गावर झालेल्या अपघातात* *सावंतवाडीतील तरुणाचा मृत्यू

मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ येथे महामार्गावर झालेल्या अपघातात सावंतवाडीतील जय अंबे स्वीट मार्टच्या रायका कुटुंबातील युवक रतन प्रकाश रायका (४५, मूळ राजस्थान सध्या रा. सावंतवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला.ही घटना मंगळवारी सकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कुडाळ येथे घडली. दरम्यान यात अन्य तिघेजण जखमी झाले आहेत. लादु रायका, साई परब व निलू अशी त्यांची नावे आहेत. ते निपाणी येथे जत्रेसाठी गेले होते. तेथून परतत असताना हा अपघात घडला. त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबूळी येथे हलविण्यात आले आहे. तर रतन याचा मृतदेह कुडाळ येथे ठेवण्यात आला असून शवविच्छेदनानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.काही वर्षांपूर्वी रतन यांच्या भावाचे इन्सुली घाटीत झालेल्या अपघातात निधन झाले होते. त्यानंतर या कुटुंबांवर दुसरा आघात झाला आहे. रतन हा इंजिनिअर होता. राजस्थान येथे मायनिंग कंपनीत तो काम करत होता. काही दिवसांपूर्वी तो सावंतवाडीत आला होता.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button