बेपत्ता बिबट्या कात्रज प्राणी संग्रहालयातच; CCTV समोर**खबरदारीचा उपाय म्हणून कात्रज प्राणी संग्रहालय आज बंद
कात्रज संग्रहालयात असणारा बिबट्या अनाथालयातून बाहेर पळाल्याची घटना कात्रज संग्रहालयात सोमवारी घडली. बिबट्या पिंजऱ्याच्या अनाथालयाच्या जवळपास आहे व त्याला शोधण्याचे काम सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते.मात्र अजूनही बिबट्याचा शोध लागला नाही. परंतु आज आज पहाटेच्या सुमारास या बिबट्याच्या पायाचे ठसे कात्रज प्राणी संग्रहालयातील पानवठ्याजवळ आढळले आहेत. त्यामुळे बिबट्या कात्रज संग्रहालयातच असल्याचे समोर आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मागील 24 तासापासून बेपत्ता असलेला कात्रज प्राणी संग्रहालयाच्या अनाथालयातील बिबट्याचा अजूनही शोध सुरूच आहे. दरम्यान रात्री एका लाडकी ओडक्याच्या आश्रयाला बसलेला बिबट्या पुन्हा दिसेनासा झाला. वनविभागाचे कर्मचारी, फायर ब्रिगेडचे जवान, आणि प्राणी संग्रहालयाचे कर्मचारी या बिबट्याचा शोध घेत आहे. दरम्यान आज पहाटेच्या सुमारास या बिबट्याच्या पायाचे ठसे कात्रज प्राणी संग्रहालयातील पानवठ्याजवळ आढळले आहेत. त्यामुळे रात्री हा बिबट पाणी पिण्यासाठी या ठिकाणी आला असावा असा कयास लावला जात आहे.. जंगली प्राणी शक्यतो रात्रीच्या वेळेसच पाणी पिण्यासाठी पानवठ्याकडे जात असतात. त्यामुळे हा बिबटही पाणी पिण्यासाठी गेला असण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कात्रज प्राणी संग्रहालय आज बंद ठेवण्यात आले आहे. www.konkantoday.com