नदीत कचरा टाकताय..? ही ठिकाणे आता सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या कक्षेत

नदीपात्र असो अथवा परिसरात कचरा टाकत असाल तर आताच सावध व्हा. कारण ही ठिकाणे आता सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या कक्षेत आली आहेत. एवढेच नाही, तर कचरा टाकताना जर का तुम्ही आढळल्यास पोकळ बांबूचे फटके खाण्याचीही तयारी ठेवा. होय हे खरे आहे. शहरातील गुहागर बायपास मार्गावरील शिवनदी परिसरात तशी सूचना देणारा एक बॅनरच झळकतो आहे. नागरिकांच्या बेशिस्तीला लगाम लावण्यासाठी थेट ऍक्शनचाच इशारा देणारा हा बॅनर सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button