
काजू मंडळाचे मुख्यालय**प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले येथे स्थापन करण्यास मान्यता
शासनाने गतवर्षी महाराष्ट्र राज्य काजू मंडळाची स्थापना केली होती. मंडळाचे मुख्यालय वाशी-नवी मुंबई येथे होते, पण आता हे मुख्यालय प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ले येथे स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मंडळाचे विभागीय कार्यालय रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसहित कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथे स्थापन करण्यास यापूर्वी मान्यता देण्यात आली होती; मात्र काजू उत्पादन क्षेत्राच्या मध्यवर्ती ठिकाणी काजू मंडळाचे मुख्यालय असणे आवश्यक असल्याने आता वाशी-नवी मुंबई ऐवजी हे मुख्यालय प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले येथे स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे.www.konkantoday.vom