
शासनाने शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी देवून शेतकर्यांना उभारी द्यावी, -प्रकाश साळवी
कोकणचा हापूस आंबा, त्याची दयनीय अवस्था झाल्याने शासनाने शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी देवून शेतकर्यांना उभारी द्यावी, अशी मागणी प्रकाश साळवी यांनी केली. पावसमध्ये हापूस आंबा बागायतदार सहकार संस्थेची वार्षिक सभा पार पडली. यावेळी अध्यक्ष साळवी यांनी ही मागणी केली.
भविष्यात येणार्या कोणत्याही निवडणुका असू देत जर शेतकर्यांना त्यांच्या हक्काचा न्याय मिळाला नाही तर मतदानावर बहिष्कार घालू, असा इशारा दिला. या सभेला उपस्थित प्रदीप सावंत, अक्रम नाखवा, सुहास शिंदे, मंगेश साळवी, मन्सूर काझी, मुदस्सर मुकादम, उमंग साळवी, जावेद काझी, अविनाश गुरव, शालिमार कीर, अमृत पोकडे, मंगेश भाटकर, सुरेंद्र भडेकर, नाना शिंदे उपस्थित होते.
आंबा बागायतदारांनी शेती कर्ज घेतले आहे. त्यावर विमाही काढला आहे परंतु विम्याच्या जाचक अटीमुळे शेतकर्यांना विम्याचा लाभ होत नाही. त्यासाठी शासनाने विमा कंपन्यांकडून होणारी शेतकर्यांची फसवणूक थांबवावी व विम्याची रक्कम थेट शेतकर्यांच्या खात्यामध्ये जमा करावी, अशी मागणी या सभेमध्ये केली आहे. www.konkantoday.com