8-9 तारखेपर्यंत वाट बघणार अन्यथा.., मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
मराठा आरक्षणासाठी आंदोलन आणि उपोषण करत मनोज जरांगे पाटलांनी सरकारला धारेवर धरले आहे. उपोषण केल्यामुळे जरांगे पाटील यांची तब्ब्येत खालावली होती, त्यामुळे ते आता विश्रांती घेत आहेत.आज पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केला आहे. ‘फडणवीस यांचा महिला कार्यकर्त्यांच्या आडून माझ्यावर हल्ल्याचा डाव आहे. एवढ्या खालच्या दर्जाला जाणे गृहमंत्र्याचं काम नाही, तुम्हाला हे शोभत नाही’ असं जरांगे पाटलांनी म्हटले आहे. तसेच फडणवीस यांनी मराठ्यांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्यात मराठा द्वेष ठासून भरलेला आहे असा आरोपही जरांगेनी केला.मी राजकारणात पडणार नाही, मी समाजाचा मालक नाही. 8-9-तारखेपर्यत वाट बघणार आहोत, नंतर आंदोलन करणार आहेwww.konkantoday.com