
डेरवणमध्ये २१ मार्चपासून युथ गेम्स
विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टतर्फे दहाव्या डेरवण युथ गेम्स २१ ते २८ मार्च या कालावधीत होणार आहेत. डेरवण येथील क्रीडासंकुलात १८ खेळांच्या स्पर्धांसाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे.स्पर्धेत अॅथलेटिक्स, जिम्नॅस्टिक, बॅडमिंटन, टेबलटेनिस, जलतरण, तिरंदाजी, नेमबाजी, बुद्धिबळ, कॅरम, देशी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कबड्डी, खो-खो, लंगडी, मल्लखांब, योगा या वैयक्तिक खेळासह फुटबॉल, व्हॉलिबॉल, बास्केटबॉल या खेळांचा समावेश आहे. त्याचबरोबर ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करण्यात आलेला वॉल क्लाइम्बिंग या साहसी खेळाचीही स्पर्धा पाहण्यास मिळणार आहे. स्पर्धेत राज्यभरातील आठ हजारापेक्षा अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पर्धेचे उद्धाटन २१ मार्चला रोइंगमधील ध्यानचंद पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ खेळाडू स्मिता शिरोळे यादव यांच्या उपस्थितीत होणार आहे. स्पर्धेचा समारोप २८ ला होणार असून महाराष्ट्र जिम्नॅस्टिक असोसिएशनचे अध्यक्ष संजय शेट्ये उपस्थित राहणार आहेत. www.konkantoday.com