
शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलच्या यादीनुसार निवड केलेल्या उमेदवारांच्या* *कागदपत्रांची पडताळणीत**५५ उमेदवार गैरहजर
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलच्या यादीनुसार निवड केलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी गेल्या २ दिवसांपासून सुरू होती.दोन दिवसाच्या या पकियेत एकूण १०६८ उमेदवारांपैकी ५५ उमेदवार गैरहजर राहिले. पात्र ठरलेल्या शिक्षकांना रिक्त शाळांवर नियुक्ती देण्यासाठी समुपदेशन घेण्यात येणार आहे.जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षक भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. प्राथमिक शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवर १ हजार ६८ उमेदवारांची पहिली यादी नुकतीच जाहीर झाली. त्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणीची प्रकिया जिल्हा परिषद प्रशासनस्तरावर पूर्ण झाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पूजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया झाली.www.konkantoday.com