जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षक भरतीसाठी निवड केलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी गुरूवारपासून सुरू

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलच्या यादीनुसार निवड केलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी गुरूवारपासून सुरू झाली आहे. दोन दिवसांच्या या प्रक्रियेनंतर त्यात पात्र ठरणार्‍या उमेदवारांना समुपदेशनाद्वारे नियुक्त्या दिल्या जाणार आहेत. हे समुपदेशन पुढील आठवड्यात रत्नागिरीत आयोजित केले जाणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षक भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. प्राथमिक शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवर १ हजार ६८ उमेदवारांची पहिली यादी नुकतीच जाहीर झाली आहे. निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया २९ फेब्रुवारीपासून रत्नागिरीत सुरू झालेली आहे. यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागातील ७० अधिकारी, कर्मचारी यांची ११ पथके नेमण्यात आली आहेत. ही प्रक्रिया १ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.पुढील महिन्यात लोकसभा निवडणुक लागण्याची शक्यता असल्यामुळे शिक्षक भरतीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शासनाकडून पावले उचलण्यात आली होती. पहिल्या टप्प्यातील यादी नुकतीच जाहीर झाली आहे. पोर्टलवर झालेल्या पहिल्या यादीमध्ये मराठी माध्यमाच्या १ हजार १० तर उर्दूचे ५८ उमेदवारांची निवड झाली आहे. शासनाच्या आदेशानुसार भरती प्रक्रियेत रत्नागिरी जिल्हा परिषदेत एकूण रिक्त जागा दोन हजारापेक्षा अधिक आहेत. पण त्यापैकी ७० टक्के जागा १ हजार ४५१ मराठी माध्यमाच्या आणि ११५ उर्दू माध्यमाच्या जागांवर नियुक्त्या दिल्या जाणार आहेत. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button