उमेदवार कोण आहे यापेक्षा जागा जिंकण्याचे उद्दिष्ट आहे,- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबाबत मंत्री रवींद्र चव्हाण यांची सावध भूमिका
कोणत्या पक्षाला उमेदवारी द्यायची हा निर्णय वरिष्ठांचा आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये उजवी विचारसरणी विजयी होणार.त्यामुळे उमेदवार कोणीही असला तरी एनडीए जिंकणार. उमेदवार कोण आहे यापेक्षा जागा जिंकण्याचे उद्दिष्ट आहे, असे सांगत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या मतदारसंघात उमेदवारी कोणाला मिळणार, हा प्रश्न गुलदस्त्यात ठेवला.रत्नागिरी दौऱ्यावर आले असता सायंकाळी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, महाराष्ट्रात ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचे लक्ष्य आहे. पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत, याकरिता सर्व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. एनडीएतील भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी अजितदादा गट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व सर्व घटकपक्ष उजव्या विचारसरणीचा उमेदवार विजयी करतील.www.konkantoday.com