
उपोषणकर्ते भगवान कोकरे महाराज यांची प्रकृती बिघडली; रक्ताची उलटी झाल्याने प्रकृती गंभीर उपचार घेण्यास नकार
गेल्या दहा दिवसांपासून लोटेमाळ येथे सुरू असलेल्या भगवान कोकरे महाराज यांच्या आमरण उपोषणाची अद्याप शासनस्तरावर दखल घेतलेली नाही. परिणामी त्यांची प्रकृती दिवसेदिंवस खालावत असून शनिवारी त्यांना रक्ताची उलटी झाली.त्यामुळे लोटे प्राथमिक केंद्रातील आरोग्य यंत्रणा धास्तावली आहे. याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दोन वेळा अहवाल सादर केला आहे. मात्र कोकरे यांनी उपचार करून घेण्यास नकार दिल्याने आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली आहे.राज्यात गोशाळेतील गायींना शासनाने चारा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी भगवान कोकरे महाराजांनी वर्षभरात तिनदा उपोषण केले. आता चौथ्यांदा त्यांच्यावर उपोषणाची वेळ आली. २२ फेब्रुवारीपासून गोशाळेतच त्यांनी आमरण उपोषण सुरू केले. तेव्हापासून आजतायागत गोशाळेतील जनावरे देखील चारा पाण्यापासून वंचीत आहेत.www.konkantoday.com