यंत्रणांना हाताशी धरून केला जाणारा सत्तेचा दुरुपयोग थांबवावा -आमदार अनिल परब
भाजपाकडून तपास यंत्रणांचा गैरवापर सुरु असल्याचा आरोप उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे आमदार अनिल परब यांनी विधीमंडळात केला. आपल्या आक्रमक शैलीत पुराव्यानिशी अनिल परब यांनी विधान परिषदेत चांगलेच धारेवर धरले.उद्योजक व प्रगतशील शेतकरी सदानंद कदम यांच्या बाबत काहीच आक्षेप नव्हता तर मग तब्बल ११ महिने त्यांना जेलमध्ये कशासाठी ठेवले असा सवाल त्यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. सुप्रीम कोर्टात सदानंद कदम यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी वेळी आमची कोणतीच हरकत नाही असे तपास यंत्रणांनी सांगितले. हरकत नव्हती तर मग ११ महिने आत का ठेवले असा संतप्त सवाल त्यांनी सरकारला केला.सत्तेच्या हव्यासापोटी अधिकारांचा गैरवापर करत केंद्रीय यंत्रणांचा छोट्या छोट्या गोष्टींसाठी कशा प्रकारे गैरवापर केला जातो याचे उत्तम उदाहरण म्हणजे माझे मित्र सदानंद कदम यांच्यावरील कारवाई. आमच्याशी वैर असेल तर ते आम्ही समजू शकतो पण यंत्रणांना हाताशी धरून केला जाणारा सत्तेचा दुरुपयोग थांबवावा असे ठणकावत आमदार अनिल परब यांनी स्पष्ट शब्दात सरकारची कानउघाडणी केली आहे ,अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानपरिषदेमध्ये आमदार अनिल परब यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या चाललेल्या मनमानी कारभाराचे वाभाडे काढलेwww.konkantoday.com