दापोली तालुक्यातील केळशी गावामध्ये आज होणार कांदळवन उत्सव…

दापोली तालुक्यातील केळशी या निसर्गरम्य आणि थंड हवेचे ठिकाण, तसेच नारळी पोफळींच्या छायेत वसलेल्या गावामध्ये आज 5 एप्रिल रोजी कांदळवन उत्सव साजरा होणार आहे. दापोली तालुक्यामध्ये एकूण 293.035 हेक्टर कांदळवन क्षेत्र महाराष्ट्र शासन कांदळवन कक्षांतर्गत संरक्षित करण्यात आला आहे. त्यात केळशी येथे 6.0322 हेक्टर एवढे कांदळवन क्षेत्र आहे.हा उत्सव महाराष्ट्र शासन कांदळवन कक्ष, कांदळवन सहव्यवस्थापन समिती, केळशी जलस्वराज्य ग्रामपंचायत, केळशी व मराठमोळी स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्याने होत आहे. उत्सवाचे औचित्य साधून केळशी गाव पर्यटन ठिकाण म्हणून घोषित करण्यात येणार आहे. सदरचा कांदळवन उत्सव म्हणून प्रथमच रत्नागिरी जिल्ह्यात होत आहे.

कांदळवन उत्सवानिमित्त आज 5 एप्रिल रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शाळकरी मुलांसाठी केळशी जि. प. शाळेत प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कांदळवन प्रदर्शन, कांदळवन लघुपट आणि कांदळवन फेरी आदी कार्यक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जाणार आहे. आखावे आळी येथील महावीर भवनात पोस्टर व लघु प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवातील संपूर्ण दिवसाचे कार्यक्रम सर्वांसाठी विनाशुल्क खुले आहेत. जास्तीत जास्त पर्यटन प्रेमींनी या ठिकाणी सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button