माकडे पकडण्याचा आर्थिक भार गावाला भरावा लागणार
मोठ्या प्रमाणात नुकसान करणारी माकडं, वानर यांच्या बंदोबस्ताच्या हेतूने त्यांना पकडण्यात येणार आहे. परंतु यासाठी होणारा खर्च तेथील गावाला करावा लागणार असल्याचे नुकतेच समोर आले आहे. यामुळे वनप्रशासनाबाबत नाराजी असून लोकप्रतिनिधींनी देखील निधीसाठी प्रयत्न प्रयत्न करून ग्रामीण भागातील नागरिक व शेतकर्यांना त्रासमुक्त करण्याची मागणी जोर धरत आहे.माकड, वानर यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. शिवाय या माकडांमुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थ, शेतकरी खूपच हैराण झाले आहेत. त्यांच्यामुळे दिवसेंदिवस मोठे नुकसान होत असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याकरिता दापोलीत मोर्चादेखील काढण्यात आला होता. तसेच वेळोवेळी वनविभागासह इतर प्रशासकीय अधिकार्यांना निवेदनेही शेतकरी वर्गाकडून देण्यात आली होती. त्यानंतर या माकडांना पकडण्याची मोहीम आखण्यात आली. त्यानुसार माकडांना पकडण्याचे प्रात्यक्षिक देखील घेण्यात आले. तसेच पुन्हा दापोली येथे वनविभाग व शेतकरी यांच्या बैठक पार पडली.या बैठकीत निधी अभावी गाडीचा खर्च गावाने करावा असे सुचवण्यात आले. वनविभाग माकडं पकडण्याचे साहित्य व मनुष्यबळ देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुरेसा निधी नसल्याने ज्या गावात माकडांचा अधिक त्रास आहे अशा गावांना माकडं पकडण्यासाठी होणारा खर्च करून या उपद्रव घालणार्या माकडांचा बंदोबस्त करणे गरजेचे असल्याचे शेतकरी सांगत आहेत. दिवसेदिवस नुकसान पाहता एक दिवस शेती, बागायती ओसाड पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत वनविभागाकडे संपर्क साधला असता संपर्क झाला नसल्याचे सांगण्यात येते. www.konkantoday.com