
फेक नरेटिव्हला आळा घालण्यासाठी ठाकरे गटाने खास रणनीती आखली.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटासंबंधित फेक नरेटिव्हला आळा घालण्यासाठी ठाकरे गटाने खास रणनीती आखली आहे.शिवसेना ठाकरे गटाची डिजिटल शाखा यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे समोर येत आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून फेक नेरेटिव्हला उत्तर देण्यासाठी आणि रोखण्यासाठी ठाकरे गटाच्या माध्यमातून डिजिटल शाखेकडून आता नियंत्रण ठेवले जाणार आहे. एक वर्षांपासून ठाकरे गटाच्या युवासेनेकडून डिजिटल शाखेचे काम केले जात असून शिवसेना करत असलेले काम देखील या शाखेच्या माध्यमातून दाखवले जात आहे.