
बायोगॅस प्रकल्पातून मिळणार शुद्ध पाणी ; पुण्यातील शास्त्रज्ञ पार्थसारथी मुखर्जी यांचे संशोधन
बायोगॅस प्रकल्पात आधुनिक तंत्रज्ञान वापरून दररोज एक हजार ते एक लाख लिटर पाण्याची निर्मिती करण्याचे तंत्रज्ञान पुण्यातील शास्त्रज्ञ पार्थसारथी मुखर्जी यांनी विकसित केले आहे.आपल्या संशोधनाची माहिती देताना मुखर्जी म्हणाले, की ओल्या कचऱ्यापासून खत आणि ऊर्जा निर्मितीसाठी बायोगॅस प्रकल्प उभारण्यात येतात. मात्र याच प्रकल्पामधून उर्जेबरोबरच आपल्याला पाणीही मिळू शकते. बायोगॅस एक हायड्रोकार्बन आहे.यामध्ये मोठ्या प्रमाणात हायड्रोजन असतो. आपण जेव्हा बायोगॅस पेटवतो, तेव्हा ठरावीक तापमानानंतर यातील हायड्रोजन ऑक्सिजनच्या संपर्कात येऊन पाणी तयार होते व वाफेच्या रूपात वर उडून जाते. अशा वेळी चिमणीच्या तोंडाशी हे वॉटर रिकव्हरी युनिट वापरल्यास पिण्यायोग्य पाणी मिळू शकते. एक किलो बायोगॅसपासून दोन लिटर पाणी तयार होऊ शकते, असा दावा त्यांनी गुरुवारी (ता. २९) पत्रकार परिषदेत केला.यावेळी ‘व्हीजीटीआय’मधील अभियंता रोहिणी खारकर, स्थापत्य अभियंता श्रुणाली आपटे, ‘सीओईपी’मधील अभियंता सुभाष गुप्ते, आयआयटी मुंबईचे वैमानिक अभियंता मिलिंद पालकर, डाऊ केमिकलचे माजी व्यवस्थापकीय संचालक डॉ. मनोज खारकर उपस्थित होते.www.konkantoday.com