राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातून धैर्यशील पाटील यांना दिली संधी

राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने देशभरातील 9 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून धैर्यशील पाटील यांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान भाजपने या निवडणुकीसाठी पाटील यांना संधी देत मास्टरस्ट्रोक खेळला असल्याची चर्चा आता राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.कारण लोकसभा निवडणुकीनंतर भाजपचे राज्यसभेचे दोन खासदार लोकसभेत गेले. यानंतर या दोन जागा रिक्त झाल्या होत्या.दरम्यान भाजपच्या या दोन जागांवर पक्षातील अनेकांनी फिल्डिंग लावली होती. मात्र, भाजपने यातील एक जागा राष्ट्रवादीला दिली तर दुसऱ्या जागेवर धैर्यशील पाटील यांना संधी दिली. त्यामुळे भाजपमधील अनेकांचे राज्यसभा उमेदवारीचे स्वप्न भंगले आहे.रायगडचे शेतकरी कामगार पक्षाचे माजी नेते आणि माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी मार्च 2023 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता.धैर्यशील पाटील हे पेनचे माजी आमदार असून त्यांनी 2014 आणि 2019 मध्ये तिथून विधानसभेच्या निवडणुका लढवल्या आहेत. यात 2014 मध्ये त्यांचा सुमारे 4 हजार मतांनी पराभव झाला होता. तर 2018 मध्ये भाजपकडून त्यांना 24 हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button