उद्यमनगर, रत्नागिरी येथील ‘घरफोडी’ प्रकरणी आरोपी अटकेत
पडवेकर कॉलनी, उद्यामनगर येथे राहणारे एक कुटुंब बाहेरगावी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरटयाने त्यांचे बंद घर फोडून सोन्याचे दागिने चोरुन नेल्यावरुन रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 70/2024 भा.दं.वि. पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, श्री. जनार्दन परबकर यांनी या दाखल गुन्ह्याचा तपास करण्याकरिता तात्काळ एक पथक तयार करून सदर पथकाला गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना दिल्या.
सदर पथकाकडून अज्ञात आरोपीचा शोध सुरू असताना नमूद गुन्हा हा रेकॉर्ड वरील अट्टल आरोपी लियाकत अब्दुल्ला नावडे याने केलेला असले बाबतची गोपनीय माहिती प्राप्त झाली. या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आरोपी लियाकत अब्दुल्ला नावडे वय 45 वर्षे, रा. कोकण नगर बगदादी चौक, रत्नागिरी, यास दिनांक 28/02/2024 रोजी ताब्यात घेऊन त्याचे कडून गुन्ह्यात चोरीस गेलेला 100% मुद्दे माल (सोन्याचे दागिने ) व गुन्ह्यात वापरलेली ऑटो रिक्षा असा एकूण ₹ 1,66,000/- किमतीचा मुद्दे माल हस्तगत करण्यात आलेला आहे.
आरोपी लियाकत अब्दुल्ला नावडे हा घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चोरी व घरफोडीचे विविध 11 गुन्हे दाखल आहेत.
www.konkantoday.com