चिपळूण वासियांच्या मदतीसाठी रत्नागिरी तालुक्यातील भगवतीनगर येथील तरूण आले धावून

चिपळूण येथे महापुराचे अस्मानी संकट आल्यानंतर हजारो कुटुंब नेस्तनाबूद झाले, जागोजागी कचऱ्याचे ढीग साठलेत ,अनेक संसार उध्वस्त सर्वकाही काळजाला थरकाप आणणारे अशावेळी अनेक संघटना मंडळे यांनी आर्थिक मदत केली काहींनी स्वतः येऊन स्वच्छ्ता केली त्यातीलच एक होते रत्नागिरी तालुक्यातील ग्रामीण अशा भगवातीनगर गावातील तरुण शिवशक्ती मित्र मंडळाचे हे 15/20 तरुण अध्यक्ष अनिकेत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण वासियांच्या मदतीसाठी ॲक्शन मोडमध्ये धावून आले.दिनांक २७ जुलै रोजी चिपळूणमधील जागोजागी पडलेले कचऱ्याचे ढीग तसेच पसरलेली दुर्गंधी, सार्वजनिक ठिकाणी निर्माण झालेली दलदल साफ करण्यासाठी रस्त्यावरती उतरलेले दिसून आले. यावेळी कचरा उचलून चिखल साफ केल्याने येथील नागरिक गहिवरून गेले.चिपळूण शहरात चार दिवस कचऱ्याचे ढीग अस्ताव्यस्त पडलेले दिसून येत होते.यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन या मोहिमेत सहभाग घेतला.असे या तरुणांनी सांगितले. हे सर्व तरुण स्वतःच्या जेवणासह या ठिकाणी उपस्थित राहिले होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button