चिपळूण नगरपरिषदेने चिपळुणकरांच्या पाण्यासाठी वाशिष्ठीचे पाणी अडवले


चिपळूण शहरासह तालुक्यातील काही गावांमधून वाहणारी वाशिष्ठी नदी बारमाही नाही. पावसाळ्यात ती तुंडूब भरुन वाहत असली तर उन्हाळ्यात तिलाच पाणी पाणी करण्याची वेळ येते. पावसाळा सोडून ही नदी कोयना धरणाच्या काही टप्यांमध्ये होणार्‍या वीज निर्मितीनंतर सोडल्या जाणार्‍या पाण्यावर अवलंबून असतेः याच पाण्यावर शहरासह त्याखालील मिरजोळी, कोंढे, शिरळसह अन्य गावांच्या पाणी योजना चालतात. असे असताना शहराची तहान भागवण्यासाठी नगरपरिषदेने खेर्डी-माळेवाडी येथील आपल्या जॅकवेलजवळ काही वर्षापासून बंधारा घातला आहे.
या जॅकवेलमधून इतकी वर्षे अर्ध्या शहराला पाणी पुरवा केला जात होता. मात्र आता गोवळकोट जॅकवेलमधून अर्ध्या शहराला होणारा गढूळ, मचूळ, खारट पाण्याचा पुरवठा व यावरुन नागरिकांची असलेली नाराजी दूर करण्यासाठी संपूर्ण शहरालाच खेर्डी येथून पाणीपुरवठा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यानुसार मुरादपूर भागाला येथून पाणी देण्यास सुरुवात झाली असून उर्वरित गोवळकोटगाव, गोवळकोटरोड, पेठमाप, उक्ताड भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी पाईपलाईनचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे साहजिकच खेर्डी येथील जॅकवेलजवळ अधिक पाणीसाठा करावा लागणार आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button