
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे २० धरणे पूर्णपणे भरली
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे जिल्ह्यातील प्रमुख पाच नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. तिलारी, कर्ली सातंडी, देवधर या प्रमुख धरणांतून २३ हजार लिटर क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २० धरणे पूर्णपणे भरली असून सध्या धरणांमध्ये ७५ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे