
लायन्स क्लब रत्नागिरी च्या वतीने कारागृहात ‘दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रम संपन्न
लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी तर्फे व सप्तसूर निर्मित ‘दिवाळी पाडवा पहाट – सुरेल गाण्यांचा कार्यक्रम’ हा विशेष उपक्रम बुधवार, दि. २२ ऑक्टोबर २०२५ रोजी रत्नागिरी कारागृह परिसरात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचा उद्देश कैद्यांना सणासुदीच्या काळात आनंदाचा आणि सांस्कृतिक अनुभव देण्याचा होता.
सकाळी ८ वाजता सुरु झालेल्या या कार्यक्रमात प्रसिद्ध गायकांनी सादर केलेल्या सुरेल गीतांनी कारागृहातील वातावरण भारून गेले. कैद्यांनीही या सुरेल मेजवानीचा मनमुराद आस्वाद घेतला. काही कैद्यांनी उत्स्फूर्तपणे गाणी सादर करून आपल्या कलागुणांचे दर्शन घडवले,
कार्यक्रमास कारागृह अधीक्षक श्री. संजय पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून अशा सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
या वेळी MJF लायन गणेश धुरी, लायन शामल शेठ, अध्यक्ष लायन संजय पटवर्धन, लायन शरद नागवेकर, लायन मनोज सावंत लायन डॉ. गणेश कुलकर्णी, लायन अस्लम वास्ता, लायन अॅड. महेंद्र मांडवकर, लायन अमेय वीरकर, लायन विशाल ढोकले यांची उपस्थिती व विशेष सहकार्य लाभले.




