अमंली पदार्थांची विक्री करणा-या ४ जणांना सापळा लावून पकडले,संगमेश्वर पोलिसांची कारवाई


संगमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतमध्ये कसबा शास्त्रीपुल येथे चोरटया पध्दतीने अंमली
पदार्थांची विक्री होणार असल्याची गोपनीय खात्रीशीर माहिती मिळाल्याने लागलीच पोलीस निरीक्षक श्री. सुरेश गावीत यांनी पोलीस स्टाफसह तात्काळ कसबा शास्त्रीपुल येथे जावून सापळा लावुन ४ आरोपीना मुद्देमालासह संगमेश्वर पोलिसानी रंगेहात पकडले आहे.
आरोपी १)अजय राजेंद्र काणेकर, वय ३८ वर्षे, २) सौ. अक्षरा अजय काणेकर, वय ३६ वर्षे, दोघे रा. असगोली,मधलीवाडी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी, ३) मुस्ताक इब्राहिम मुल्लाजी वय ५६ वर्षे, कसबा शास्त्रीपुल ता. संगमेश्वर, ४) कामील हसन मुल्ला, वय ४८ वर्षे, रा. डिंगणी,मोहल्ला ता. संगमेश्वर, जि.रत्नागिरी यांना पकडून त्यांचेकडून रु. ३,००,०००/- किंमतीचा चरस अंमली पदार्थ व मोटारसायकल असे एकूण रु. ३,४०,०००/- रक्कमेचा मुद्देमाल हस्तगत करणेत आलेला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button