
ठेवीले अनंत तैसेची रहावे, खासदार सुनील तटकरे यांची माजी खासदार गीते यांच्यावर टीका
रायगड लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याचे स्पष्ट करत ठेवीले अनंत तैसेची रहावे, अशी कोटी करत त्यांनी माजी खासदार अनंत गीते यांचा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत चांगलास समाचार घेतला. रायगडवरील शरद पवार यांच्या गटाला मिळालेल्या तुतारी अनावरणाचा झालेला राजकीय कार्यक्रम संतापजनक होता, असा हल्लाबोलही चढवला.रायगड जिल्ह्यातील महाड येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकार्यांनी आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धांना भेट देण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे महाड येथे आले असता शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, न्यायालय, निवडणूक आयोग व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजित पवार यांनाच मान्यता देत खरा राष्ट्रवादी कॉंग्रेस व पक्षाचे चिन्हे हे अजित पवारांच्या गटाला दिल्याचे स्पष्ट केले.www.konkantoday.com