
खेर्डी चिपळूण येथे मिरगल चाळ येथील इमारतीचा अर्धा भाग कोसळला
चिपळूण खेर्डी बाजारपेठेत असणारी एक जुनी इमारत काल रात्री ८ वाजण्याच्या सुमारास कोसळली .मिरगल चाळ म्हणून ओळखली जाणारी ही इमारत ही खूप जुनी होती मात्र दोन वर्षापूर्वीच भाडेकरूंनी सावधगिरी बाळगून बाहेर पडलेले असल्याने सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. प्रशासनाच्यावतीने मंडळ अधिकारी उत्तम जाधव, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
www.konkantoday.com