
कोरोना प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात मनाई आदेश असतानाही बेकायदेशीर प्रवाशी वाहतूक करणार्या विरुध्द गुन्हा दाखल
कोरोना प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात मनाई आदेश असतानाही प्रवाशी आणि मजुरांची ई पास नसताना बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आलेआहेत.
सल्लाउद्दीन अल्लाउद्दीन सिद्दीकी( उत्तरप्रदेश) सध्या रा.मंदरेकर पेट्रोलपंप बाबनवाडी , राज्य – गोवा) याने जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांचे मनाई आदेश असताना त्याच्या ताब्यातील माल वाहू बोलेरो पिकअप गाडीतून गोवा ते पनवेल अशी विनापरवाना कोणताही ई – पास नसताना त्यात २७ प्रवासी भरुन वाहतुक करीत असताना गोवा ते मुंबई हायवे रोडवर कोर्ले फाटा येथे पोलिसांनी पकडले. तर दुसरीकडे रत्नागिरीत असाच प्रकार घडला असून जिल्हा दंडाधिकारी रत्नागिरी यांचे मनाई आदेश लागू आहेत. असे असताना कोरोना अजमल मोहम्मद खान रा. बिहार याने त्याच्या ताब्यातील ट्रक बिगर परवाना कोणताही ई – पास नसताना ३१ कामगार मजूर यांना ट्रकमध्ये बसवुन अवैध प्रवासी घेवुन जात असताना जयगड ते हातखंबा रोडवर खंडाळा नाका येथे पोलिसांना तो सापडला. पोलिसांनी या दोन्ही प्रकरणांतील वाहन चालकांवर जयगड आणि लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
www.konkantoday.com