
भरणे-जगबुडी नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस घट
पावसाळ्यात ओसंडून वाहणार्या भरणे-जगबुडी नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस घट होत चालली आहे. गेल्या काही दिवसांपासून उष्म्याने कहर केल्याने नदीपात्रात पाण्याचा ठणठणाट निर्माण झाला आहे. पाणीसाठ्यात घट झाल्याने नदीपात्रातील झुडुपे दृष्टीस पडत आहेत. ही झुडुपे तोडण्यासाठी ग्रामपंचायतीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात येत आहे.मुबलक पाऊस पडूनही जगबुडी नदीपात्र कोरडे पडत आहे. यावर्षी मुबलक पर्जन्यवृष्टीमुळे जगबुडी नदीपात्रात जानेवारी अखेरपर्यंत मुबलक पाणीसाठा होता. सद्यस्थितीत मात्र पाणीसाठ्यात कमालीची घट झाली आहे.www.konkantoday.com