महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवारी होणाऱ्या गट –क पूर्व परीक्षेची बैठक व्यवस्था

. रत्नागिरी, दि. 29 ) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र गट –क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024, रविवार दि. 1 जून रोजी रत्नागिरी तालुक्यात 2 उपकेंद्रावर एक सत्रामध्ये सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी एकूण 825 उमेदवार बसणार आहेत. परीक्षेची बैठक व्यवस्था पुढीलप्रमाणे आहे.

पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी या उपकेंद्रावर बैठक क्र.RT001001 ते RT 001360 तर फाटक हायस्कूल रत्नागिरी येथे RT002001 ते RT002465 अशी बैठक व्यवस्था आहे.

आयोगामार्फत आयोजित परीक्षांमध्ये कॉपीचा/गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्या घटनांची आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. अशा प्रकरणी आयोगाकडून संबंधितावर फौजदारी व प्रशासकीय अशा दोन्ही स्वरुपाची कारवाई करण्यात आली आहे. परीक्षांकरिता आयोगाने कडक उपाययोजना केलेल्या आहेत. परीक्षा उपकेंद्रावर उमेदवारांची आयोगाकडून नियुक्त करण्यात आलेल्या सेवा पुरवठादार संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून तपासणी करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button