घरगुती वादातून पत्नीच्या हातावर सुरीने वार करणाऱ्या पतीने राहत्या घरी गळफास घेऊन केलीआत्महत्या

घरगुती वादातून पत्नीच्या हातावर सुरीने वार करणाऱ्या पतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सायंकाळी उशिरा परटवणे, सरोदेवाडी येथे घडली आहे.शंकर दत्ताराम रसाळ असे आत्महत्या केलेल्या प्रौढाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी गाडीतळ येथे पत्नी घरकाम करण्यासाठी गेलेली असताना पती शंकर रसाळने तिथे जाऊन हातांच्या थापटाने मारहाण करून आपल्याकडील धारदार सुरीने पत्नीच्या डाव्या हाताच्या पंजावर वार करुन दुखापत केली होती. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंगळवारी सायंकाळी घरात कोणी नसताना शंकरने दोरीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला. थोडयावेळाने नातेवाईक घरी आल्यावर त्यांना हा प्रकार उघडकीला आला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button