कशेडी बोगद्यात एकेरी वाहतूक सुरु असतानाच रात्री नियम मोडून दुसर्या बाजूनेही वाहने
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणार्या हलक्या वजनाच्या एकेरी वाहतुकीसाठी खुला झाल्याने प्रवास वेगवान अन आरामदायी झाला आहे. मात्र रात्रीच्या सुमारास मुंबईच्या दिशेनेही जाणारी वाहने बोगद्यातून मार्गस्थ होत असल्याने वाहनचालकांची फसगतच होत आहे. विरूद्ध दिशेने धावणार्या वाहनांमुळे बोगद्यात एकेरी वाहतुकीची पायमल्ली सुरू आहे. नियोजनाच्या अभावामुळे अपघातांचा धोका कायम असून वाहनचालकांची सुरक्षितता ऐरणीवरच आली आहे.मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले चौपदरीकरण अन प्रलंबित कामांमुळे वाहतुकीसाठी खुला होण्याच्या प्रतीक्षेत राहिलेला कशेडी बोगदा चर्चेचाच विषय ठरला होता. गणेशोत्सवात मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणार्या एकेरी वाहतुकीसाठी खुला झालेला बोगदा अवघ्या १८ दिवसातच अनिश्चित काळासाठी बंद करण्याची नामुष्की राष्ट्रीय महामार्ग खात्यावर ओढवली होती. शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कशेडी बोगदा वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीने बोगद्यातील अंतर्गत कामांनी वेग घेतला होता. त्यानुसार २४ फेब्रुवारीपासून कशेडी बोगदा एकेरी वाहतुकीसाठी खुला झाला आहे. www.konkantoday.com