
नव्या पिढीने कोकणचं सौंदर्य जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवावं-आमदार नितेश राणे
युट्युब, इंस्टाग्राम अशा सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर तरुण पिढी सक्रिय आहे. नव्या पिढीने कोकणचं सौंदर्य जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवावं जेणेकरून कोकणचा पर्यटन विकासाची गती अजून वेग घेईल असे प्रतिपादन भाजपचे आमदार नितेश राणे यांनी कोकण क्रिएटर्स सन्मान या कार्यक्रमाच्या पारितोषिक वितरणच्या वेळी केले.कणकवली शहरापासून जवळ असलेल्या जानवली येथील हॉटेल नीलम कंट्रीसाईड येथे शनिवारी(ता.२४) सायंकाळी भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘कोकण सन्मान २०२४’चे मानकरी शुभम राऊत आणि बंडी कांबळी ठरले आहेत. यावेळी रिल्स व मिम्स बनवणारा कलाकारांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी स्टार क्रिएटर्स अंकिता प्रभू-वालावलकर, (कोकण हार्टेड गर्ल), गौरी पवार (बिंधास्त मुलगी), सिद्धांत जोशी (श्रीमान लिजेंड), मंगेश काकड (मंगाजी), वृषाली जावळे (वाईनवाली), सोहन शहाणे (आरजे सोहम), गणेश वनारे (हरामखोर), प्रसाद विधाते (सेंट इन ब्यागी), कुहू परांजपे, श्रुतिक कोळंबेकर (कोण श्रुतिक), प्रशांत नाकती, शंतनू रांगणेकर आदींचा सन्मान झाला. www.konkantoday.com