
भारतीय जनता पार्टी निलेश आखाडे पुरस्कृत ढोल वादन स्पर्धेत चींचखरी ढोल पथक प्रथम..
रत्नागिरी : निलेश आखाडे ढोल वादन स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेचे उद्घाटन महिला मोर्चा जिल्हाअध्यक्षा वर्षा ढेकणे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रतिवर्षी माघी गणेशोत्सवात पहिल्याच दिवशी ही ढोल वादन स्पर्धा आयोजित केली जाते. उत्साहाच्या वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेत एकूण आठ संघांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, उमेश देसाई, दादा दळी, प्राजक्ता रूमडे, पमु पाटील, शिल्पाताई मराठे, गौरी दळवी, बाबा उर्फ संदीप नाचणकर, मंदार खंडकर इत्यादींचे मोलाचे सहकार्य मिळाले. सर्वच संघांचे सादरीकरण सुंदर झाले. या स्पर्धेत प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून उदय डान्स अकॅडमीचे उदय कांबळे, मनवा देसाई, प्रथमेश आंबेकर यांनी काम पाहिले. या ढोल स्पर्धेत चिंचखरी संघाने उत्तम सादरीकरण करत प्रथम क्रमांक प्राप्त केला याच संघातील स्मितेश बोरकर यांचा उत्कृष्ट ढोल वादक म्हणून सन्मान करण्यात आला. तर काजरघाटी संघ द्वितीय क्रमांक घेत उत्कृष्ठ वेशभूषा असणारा संघ ठरला, तर नादगर्जना वाडेकर वाडी हा संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. शिव गर्जना संघाचा ऋतिक बाणे हा उत्कृष्ट ताशा वादक ठरला. सर्व विजयी संघांचे रोख पारितोषिक व आकर्षक ट्रॉफी देऊन सर्वांना गौरवण्यात आले.
आनंदी वातावरणामध्ये पार पडलेल्या भारतीय जनता पार्टी निलेश आखाडे पुरस्कृत ढोल स्पर्धेसाठी भाजपा महिला अध्यक्ष वर्षाताई ढेकणे, सौ प्राजक्ता रूमडे, सौ नपुरा मुळ्ये, दादा ढेकणे, प्रथमेश बोडेकर, अनंत खरात, गुरुप्रसाद फाटक, नंदकुमार पांचाळ, सचिन गांधी, रुपेश देसाई आदी उपस्थित होते.