जंजिरा किल्ल्याच्या परिसरात जेट्टी बांधण्याला विरोध करणारी याचिका मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठाने फेटाळली
कोकणातील जंजिरा किल्ल्याच्या परिसरात जेट्टी बांधण्याला विरोध करणारी याचिका मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठाने फेटाळून लावली .”उच्च न्यायालय हा काय राजकीय मंच नाही.उच्च न्यायालयाला तुम्ही राजकीय आखाडा समजू नका. भारतीय पुरातत्व खाते आणि इतर प्राधिकरणांना यामध्ये प्रतिवादी केलेच नाही. त्यामुळे कायद्यानुसार अशी याचिका चालत नाही, तुम्ही ज्या मच्छीमार सहकारी सोसायटीची बाजू घेऊन आलात ते एका स्वतः याचिकाकर्ते झाले नाहीत;” अशा शब्दांत याचिकाकर्ता महेश हरिश्चंद्र मोहिते यांना न्यायालयाने सुनावले. तसेच ही याचिका न्यायमूर्ती डी. के. उपाध्याय, आरिफ एस. डॉक्टर यांच्या खंडपीठाने फेटाळून लावलीwww.konkantoday.com