गिरणी कामगार कृती संघटनेच्या वतीने घराच्या प्रश्नासंदर्भात विधान भवनावर आयोजित आक्रोश मोर्चा
___गिरणी कामगार कृती संघटनेच्या वतीने घराच्या प्रश्नासंदर्भात विधान भवनावर आयोजित आक्रोश मोर्चा अर्थसंकल्प अधिवेशनामुळे मंगळवारी (ता.२७) सकाळी आझाद मैदानावर काढण्यात येणार आहे. एकही गिरणी कामगार हक्काच्या घरांपासून वंचित रहाता कामा नये, मुंबई शहर विकास नियमावली अंतर्गत गिरणी चाळींत रहाणाऱ्या कामगार आणि उपभोगता रहिवाशांच्या धोकादायक चाळींची पुनर्बांधणी तेथेच होण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. गिरणी कामगारांच्या आतापर्यंत १ लाख ७५ हजार कामगारांनी फॉर्म भरले आहेत. कामगार संघटना कृती संघटनेने केलेल्या गेल्या दहा वर्षांच्या लढ्यात फक्त १६ हजार घरे गिरणी कामगारांना सोडतीत लागली. उर्वरित १ लाख कामगारांना घरे कधी मिळणार? उपलब्ध जागा कमी आणि घरांची मागणी मात्र अधिक अशी स्थिती आहे. गिरणी कामगार कृती संघटनेच्या वतीने २१ ऑगस्ट २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घराच्या प्रश्नावर कामगार संघटनेने भेट घेऊन चर्चा केली होती. www.konkantoday.com